पिक विमा संदर्भात शासनाचा मोठा निर्णय फक्त शेतकऱ्यांना मिळणार | weather station at Grampanchayat - Sikho Sikhao

Thursday, January 6, 2022

पिक विमा संदर्भात शासनाचा मोठा निर्णय फक्त शेतकऱ्यांना मिळणार | weather station at Grampanchayat


pik Vima
pik Vima



  शेतकऱ्यांना पीक विमा ( crop insurance) मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने आज राज्याचे कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी मंत्रालयात  बैठक घेतली.  या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार यांच्यासह स्कायमेट वेदर सर्विसेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


पिक विमा संदर्भात शासनाचा मोठा निर्णय 

फक्त शेतकऱ्यांना मिळणार

👇👇👇👇


येथे क्लिक करून पाहा




तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे ( weather station at Grampanchayat )आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.



सध्या महावेध प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. विमा कंपन्याही ही माहिती स्कायमेटकडून घेतात. त्यामुळे अधिकाधिक भागात ही केंद्रे कार्यान्वित झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. पीक विमा योजना ( pradhanmantri pik vima yojana I आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.




पिक विमा संदर्भात शासनाचा मोठा निर्णय 

फक्त शेतकऱ्यांना मिळणार

👇👇👇👇


येथे क्लिक करून पाहा



No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?