Soyabean Rate : आजचे सोयाबीनचे भाव वाढले आजचे बाजार भाव पहा शनिवार दिनांक 01-01-2022 - Sikho Sikhao

Saturday, January 1, 2022

Soyabean Rate : आजचे सोयाबीनचे भाव वाढले आजचे बाजार भाव पहा शनिवार दिनांक 01-01-2022

Soyabean
Soyabean 




गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार तर होतेच. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर सरासरीच्या तुलनेत 200 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे आज (सोमवारी) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमके काय होणार याकडे शेतकऱ्यांच्यासह व्यापारी यांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्याच दिवशी  सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. 6 हजार 100 वरील सोयाबीन थेट 6 हजार 400 वर येऊन ठेपलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी सोयाबीन विक्री करताना काही नियमांचे पालन हे करावेच लागणार आहे. सोमवारी मात्र, आवक अधिकची होऊनही दरात वाढ झाली. मात्र, कायम हीच परस्थिती राहणार नाही असाच विचार करुन आवकवर लक्ष ठेवावे लागणार आहे.



डायरेक्ट बाजार भाव पहा

👇👇👇👇


सोयाबीन बाजार भाव




सोयाबीनची आवक वाढली की दरात घट हे ठरलेलेच आहे. सोमवारी मात्र, आवक वाढूनही दरात कमालीची वाढ झाली होती. मात्र, सोयापेंडवरील स्टॅाक लिमिट, सोयाबीनचे वायदे बंदी या केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम जर दरावर होऊ द्यायचा नसेल तर मात्र, आवक ही अटोक्यातच राहिलेली चांगली आहे. आवक वाढली तर दर कमी होण्याची शक्यता असते. शिवाय सोयाबीनचे दर हे गेल्या 21 दिवसांपासून अस्थिर आहेत. यातच मागणीपेक्षा अधिक आवक सुरु राहिली तर मात्र, दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी मात्र, अचानकच आवक न वाढवता टप्प्याटप्प्याने शेतीमाल बाजारात आणला तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.



डायरेक्ट बाजार भाव पहा

👇👇👇👇


सोयाबीन बाजार भाव

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?