Proof Of Income |
उत्पन्नाचा दाखला आता ऑनलाईन (Online) पद्धतीने मिळवा आपल्या घरी बसून
👇👇👇👇
ऑनलाईन (Online) पद्धतीने मिळवा
(Proof Of Income) त्यासाठी तुम्हाला www.aaplaesrakar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यावर आपणास नवीन नोंदणी करावी लागेल .
ज्याच्या नावे दाखला (Proof Of Income) काढायचा आहे त्याच्या नावे नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारे आपला मोबाइल नंबर पडताळावा लागेल .
पुढे एक युजरनेम बनवून पासवर्ड तयार करावा व त्यानंतर पुढे नाव आणि जन्मतारीख टाकून अकाउंट तयार करावे, तसेच आधारकार्ड वरील नावदेखील टाकावे. (Proof Of Income) अकाउंट तयार झाल्याचा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर लॉगिन करावे .
लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात खाली महसूल विभाग असे आहे . महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडावे, तिथे सर्वात खाली उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) असा पर्याय आहे, तो निवडा, पुढे प्रोसिड वर क्लिक करा . पुढे उत्पन्नाचा दाखला असा पर्याय निवडावा तिथे तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल,
ओळखीचा पुरावा (कोणतेही एक ); आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा; पासपोर्ट / रेशन कार्ड /मतदार ओळखपत्र /आधार कार्ड /वीज बिल / वाहन चालवण्याचा परवाना
जर तुमचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर; जन्माचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) 15दिवसात तहसीलदारमार्फत मिळतो. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तूम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल . (1 किंवा 3 वर्ष )
अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा व नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकावा.
खाली I agree वर क्लिक करा.
माहिती योग्य असल्याची खात्री करावी व नंतर आपला आधार कार्ड वरील पत्ता तिथे टाकावा. यानंतर कुटुंबाची रेशन कार्ड प्रमाणपत्रावरची माहिती भरावी.
यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Proof Of Income) काढण्याचे कारण सांगायचे कारण काय आहे ते लिहावे. तिथे शेतीचा देखील पर्याय आहे. उत्पन्नाचे विविध साधने 3 वर्षाच्या उत्पन्नासहीत नमूद करावे.
जर तुमच्याकडे तलाठ्याच्या उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) असेल तरच तहसीलदार यांचा दाखला मिळेल
त्यानंतर समाविष्ट करावे वर Click करा.
आता डॉक्युमेंट्स अपलोड करावे.
फोटो (160pixel *200pixel ) (5 ते 20kb)
ओळखीचा पुरावा (75ते 100kb)
वयाचा पुरावा (18वर्षाखालील व्यक्तीसाठी फक्त )
उत्पनाचा पुरावा (कोणतेही एक )
तलाठी प्रमाणपत्र
स्वघोषणापत्र.
आता अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करून रु.33चे पेमेंट करावे
पेमेंट करताना PAYTM चा वापर करा अतिशय सोपी पद्धत आहे त्यासाठी तिथे असलेला QR Code कोणत्याही BHIM UPI ने scan करावा आणि उत्पनाचे प्रमाणपत्र (Proof Of Income) हे 3 कार्यालयीन दिवसात मिळेल.
उत्पन्नाचा दाखला आता ऑनलाईन (Online) पद्धतीने मिळवा आपल्या घरी बसून
👇👇👇👇
ऑनलाईन (Online) पद्धतीने मिळवा
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?