agriculture technology : पाईप लाईन, मोटर, इंजिन 75% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु अर्ज कसा व कोठे करावा?? - Sikho Sikhao

Saturday, March 26, 2022

agriculture technology : पाईप लाईन, मोटर, इंजिन 75% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु अर्ज कसा व कोठे करावा??







Subsidy for pipeline : नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाईपलाईन अनुदान योजना (Government pipeline subsidy scheme) या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो किंवा याबद्दल अटी-शर्ती (Terms and conditions) याचा अर्ज कसा करायचा या सर्वांबद्दल ची माहिती आपण येथे पाहणार आहोत. त्यामध्ये शेती विषयी राबवल्या जाणाऱ्या योजना (Agricultural schemes) अर्थातच ‘एक अर्ज एक शेतकरी योजना अनेक’ च्या अंतर्गत राबविल्या जातात. जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टल (MahaDBT portal) च्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप (PVC पाइप) किंवा एचडीपीए पाईप (HDPA pipe) साठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते.




 या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर पहा


👇👇👇👇👇


येथे सविस्तर अर्ज प्रक्रिया पहा




या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना (Subsidy for farmers) दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाइप साठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केली असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.



शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दल ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल अन्यथा असे अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात त्यावर कोणतीही पुढील कारवाई होत नाही त्याच बरोबर आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे बंधनकारक आहे.



अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्याच्या मध्ये आपल्या जमिनीचा सातबारा, ८अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन इत्यादी माहिती सादर करावी लागते.



 या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर पहा


👇👇👇👇👇


येथे सविस्तर अर्ज प्रक्रिया पहा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?